घोरकष्टोद्धरण स्तोत्र मराठी अर्थ सहित | Ghoratkashta Stotra with Marathi Meaning

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मां पाहि देवाधिदेव |
भावग्राह्यक्लेश हरिन्सुकीर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||१||

अर्थ – हे देवाधिदेवा! श्रीपाद श्रीवल्लभा! तू नित्य निराकार निर्विकार आहेस. तूच स्वयं श्री दत्तात्रेयांचा स्वरूप आहेस. आमच्या प्रार्थनेला तू फलद्रूप करून आपल्या शरणात घे आणि आमचे रक्षण कर. आमचे सर्व प्रकारचे दुःख, क्लेश यांचा तू हरण कर आम्ही तुझी भक्ती करतो. तुझे सुंदर नामाचे गुणगान करतो, कीर्तन करतो. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो l

त्वंनोमाता त्वंपिता आप्तोधिपस्त्वम् त्रातायोगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् |
त्वम् सर्वस्वम् नोप्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||२||

अर्थ – तु माता, तूच पिता, आप्त बन्धु भ्राता आहेस. हे सद्गुरु, तूच त्राता आहेस, अर्थात आम्हाला या अघोर क्लेशतून काढणारा आहेस, तूच आमचे योगक्षेम चालवणारा आहेस.
तुझ्याविना कोणीच आमच नाही, तुच सर्वस्व आहेस. हे विश्व तुझ्याच रूपाने विनटले आहे. हे त्रिविक्रम भारती ला विश्वरूप दाखवणार्या श्रीदत्ता, घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो l

पापं तापं व्याधिमाधिंच दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यम् |
त्रातारंनो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||३||

अर्थ – हे ईश्वरा, तूच आमचे पाप, ताप हरण करणारा आहेस. तूच सर्व व्याधी, दैन्य, दुःख, दारिद्र्य निवारण करणारा आहेस. या जन्म मरणाच्या च्या भीती आणि क्लेशातून मुक्त करणारा तूच आहेस तुझ्या शिवाय दुसरा कोणीच हे करू शकत नाही तूच सद्गुरू आहेस. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो l

नान्यस्त्राता नापिदातानभर्ता त्वत्तोदेवत्वं शरण्योकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||४||

अर्थ – हे सद्गुरो ! तुझ्या शिवाय आम्हाला तारणारा कोणी नाही. आम्हाला देणारा आणि आमच भरण पोषण करणारा पण तुझ्या शिवाय कोणी नाही. तेव्हां, हे सद्गुरू, आम्ही तुला अनन्य शरण आलो आहे कारण तूच आमचा देव आहेस. हे आत्रेया (अत्रिपुत्रा) आमच्या वर अनुग्रह कर, घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो l

धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं |
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||५||

अर्थ – हे अखिलान्दमूर्ते! तुच जगातल्या सगळ्या आनंदाची साक्षात मूर्ती आहेस. आम्हाला धर्मावर प्रीती दे, सन्मती आणि तुझी अर्थातच देवाची भक्ती दे. हे देवा, आम्हाला सत्संग अर्थातच चांगल्या लोकांचा साथ दे, जगातले भोग भोगून आम्हाला मुक्ती दे. तुझ्या चरणी आमचा सतत भाव असो हीच आसक्ती दे. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो l

श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमंगलवर्धनं | प्रपठेन्नियतोभक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत् ||

अर्थ – वरील पाच श्लोक लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे आहेत. तसेच, जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्ती ने पठाण करेल, तो श्रीदत्ता ला प्रिय होईल l

New Moon in Aries 2023 Rituals and impact on Other Zodiac Fumio Kishida Zodiac Sign, Horoscope, Birth Chart, Kundali and Career Zodiac signs that are more inclined to get married again! 3 Mukhi Rudraksha Benefits, Types, Power, and Significance 1 Mukhi Rudraksha Benefits, Types, Power, and Significance Saturn in Taurus Meaning, Traits, Houses in Astrology Saturn in Gemini Meaning, Traits, Houses in Astrology Lil Durk Horoscope Analysis, Zodiac Sign, Birth Chart, and Career Pedro Pascal Zodiac Sign, Horoscope, Birth Chart and Career 10 Ways How to Reconnect After a Relationship Break